जोहान्सबर्ग : इंडिया आणि साऊथ आफ्रिकेविरुद्धची तिसरी टेस्ट वांडरर्स मैदानात सुरू आहे. आज चौथा दिवस असून साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७२ रन्सची गरज आहे. सामना मध्यांतरासाठी थांबला आहे.
पण खराब खेळपट्टीमूळे हा सामना रद्द होण्याची चिन्ह आहेत. अम्पायर थोड्याच वेळात यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत.
'आम्हाला बॉल आणि बॅटमधला खेळ बघायचाय आणि या ठिकाणी तसं होत नाहीए. मी याला १० पैकी या पिचला केवळ ३ मार्क देईन' असे आफ्रिकेचा माजी कॅप्टन शॉन पॉलॉकने म्हटले.
भारताचे माजी कॅप्टन सुनिल गावस्करांनीदेखील कॉमेंट्री करताना पिचबद्दल नाराजी व्यक्त केली. पण खेळ रद्द करण्याची मागणी केली नाही. २४० रन्स बनविणाऱ्या भारतीय बॅट्समन्सचे त्यांनी कौतूक केले.
सकाळी वांडरर्स पिचवर असमान उसळी आणि गुड लेंथवर भेगा दिसल्या. असमान उसळीमूळे ३ भारतीय तर १ आफ्रिकेच्या बॅट्समनला दुखापत झाली.