पहिल्याच टेस्टमध्ये पहिली विकेट घेणाऱ्या नदीमचं रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Oct 21, 2019, 01:30 PM IST
पहिल्याच टेस्टमध्ये पहिली विकेट घेणाऱ्या नदीमचं रेकॉर्ड

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये ४९७ रन केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. टीम इंडियाकडून पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शाहबाज नदीमने त्याच्या कारकिर्दीतील पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर जुबेर हमजा आणि टेम्बा बऊमा यांच्यात ९१ रनची पार्टनरशीप झाली. रवींद्र जडेजाने हमजाला माघारी पाठवल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये शाहबाज नदीमने टेम्बा बऊमाची विकेट घेतली. नदीमच्या बॉलिंगवर ऋद्धीमान सहाने बऊमाला स्टम्पिंग केलं.

आपली पहिलीच विकेट स्टम्पिंगच्या माध्यमातून घेणारा शाहबाज नदीम हा चौथा भारतीय बॉलर बनला आहे. याआधी डब्ल्यू वीरनने कोर्टनी वॉल्शला, वेंकटरमन यांनी डेसमंड हेन्सना आणि आशिष कपूरनी कार्ल हूपरला स्टम्पिंग केलं होतं.