श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू, या खेळाडूंना विश्रांती

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू देण्यात आलाय. दरम्यान, सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2017, 08:02 AM IST
श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू, या खेळाडूंना विश्रांती title=
Courtesy: IANS

कोलंबो : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू देण्यात आलाय. दरम्यान, सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे.

गोलंदाजीची धार कमकूवत

भारताविरुद्ध २० डिसेंबरपासून टी-२० मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी लसित मलिंगाला वगळल्याने श्रीलंकेची गोलंदाजी कमकूवत झालेय. अनुभवी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला श्रीलंका संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे संघ जाहीर करण्यात आला नव्हता. दरम्यान, श्रीलंकन क्रीडामंत्री धनंजय जयसेकरा यांची मंजुरी मिळाल्यानंतर संघ जाहीर करण्यात आला.

दरम्यान, श्रीलंकेकडून मलिंगाला विश्रांती देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. मलिंगा बांग्लादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे.

यांना मिळाली संधी

सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर विश्व फर्नांडो आणि दासून शनाका यांची निवड करण्यात आली. 

कोठे होणार सामने

पहिला टी-२० सामना २० डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळल्या जाणार आहे. त्यानंतर २२ डिसेंबरला इंदूरमध्ये दुसरा तर २४ डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरा सामना होणार आहे.

श्रीलंका संघ

थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुलास परेरा, दनुष्का गुणतिलक, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रम, दासून शनाका, चतुरंगा डिसिल्वा, सचित पतिराणा, धनंजय डिसिल्वा, नुवान प्रदीप, विश्व फर्नांडो, दुशमंत चमिरा.