धोनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा वाचून व्हाल थक्क

वाचा सविस्तर वृत्त... 

Updated: Nov 12, 2020, 01:04 PM IST
धोनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा वाचून व्हाल थक्क

मुंबई : कॅप्टन कूल, माही, एमएस अशा अनेक नावांनी क्रिकेट आणि एकंदरच क्रीडा वर्तुळात ख्यातीप्राप्त असणारा महेंद्रसिंह धोनी Mahendra singh dhoni कायमच सर्वांची मनं जिंकतो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याचा अंदाज अनुकरणीय ठरतो. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही. इतकंच नव्हे, तर त्याच्या ब्रँड व्हॅल्युतही कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही. 

सध्या मुंबईत नव्या घराच्या निर्मितीवरही लक्ष देणारा धोनी एका वर्षात इतकी कमाई करतो, की त्याच्या कमाईचा आकडा वाचून अनेकजण थक्क होत आहेत. CA Knowledgeच्या वृत्तानुसार माहीचं वार्षिक उत्पन्न तब्बल ७६० कोटी रुपये इतकं आहे. 

क्रिकेटव्यतिरिक्त ब्रँड एन्डॉर्समेंट, जाहिराती या माध्यमातून त्याला असंख्य ऑफर मिळतात.यातूनच काही ऑफर्सची निवड करत धोनी जाहिराती वगैरेच्या ऑफ स्वीकारतो. ज्यामुळं त्याच्या अर्थर्जनात मोठ्या फरकानं वाढ होते. आहे की नाही ही कमाल गोष्ट? 

 

दरम्यान, यंदाच्या वर्षी दुबईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात माहीला अपेक्षित सूर गवसला नाही. यामुळं काही अंशी क्रिकेटप्रेमींची निराशाही झाली. पण, ती फार काळ टीकू शकली नाही. येत्या काळात धोनी मुंबईत वास्तव्यास येणार असल्याचीही चिन्हं आहे. त्याच्या पत्नीनं सोशल मीड्यावर पोस्ट केलेले फोटो पाहून याबाबतचा अंदाज लावला जात आहे. तेव्हा आता धोनी खरंच रांचीपासून दूर मुंबईत येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.