close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'विरुष्का'ची लग्नानंतरची पहिली दिवाळी

पाहा त्यांनी नेमका कसा साजरा केला हा सण... 

Updated: Nov 8, 2018, 10:02 AM IST
'विरुष्का'ची लग्नानंतरची पहिली दिवाळी

 मुंबई : दिवाळीचा उत्साह सर्वत्रच पाहायला मिळत असून, शुभेच्छा आणि आनंदाची बरसात सगळीकडे होत आहे. याच उत्साहपूर्ण वातावरणात सेलिब्रिटी मंडळीसुद्धा त्यांच्या कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबीयांसोबत काही खास क्षम व्यतीत करताना दिसत आहेत. अशाच सेलिब्रिटींमध्ये लक्ष वेधतोय तो म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या प्रकाशपर्वाचा उत्साह अगदी आसमंतात पोहोचला असतानाच विराटने सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वांनाच या सणाच्या शुभेच्छा दिल्या. 

अनुष्कासोबतचा सुरेख असा फोटो  शेअर करत तो सर्वांसोबत या आनंदी वातावरणात सहभागी झाला. 

तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा असं कॅप्शन त्याने फोटोसोबत लिहिलं. यावेळी विरुष्काच्या चेहऱ्यावरील आमनंद पाहण्याजोगा होता. 

लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे विराटने ही दिवाळी आपल्या कुटुंबासोबत आणि खास म्हणजे अनुष्कासोबत साजरी करण्याचा निर्णय़ घेतल्याचं पाहायला मिळालं. 

क्रिकेटच्या मैदानात विराट जितक्या शिताफीने वावरतो तितक्याच सराईतपणे तो आपल्या कामात आणि खासगी आयुष्यात योग्य, सुरेख असात समतोल राखतो. 

दरम्यान, दिवाळीच्या या पर्वात विराटला काही प्रमाणात चाहत्यांच्या रोषाचाही सामना करावा लागला होता. एका वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेटपटू आणि खुद्द विराटच्याच खेळावर टीका करत परदेशी क्रिकेटपटूंना पाठिंबा देणाऱ्या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देत विराटने अशा व्यक्तींनी देशात राहू नये, या आशयाचं वक्तव्य  केलं. ज्यामुळे त्याच्यावर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली.