पाकिस्तान सुपर लीग : ओस पडले स्टेडिअम, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली...

  गेल्या २३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL 3) दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलच्या तीन सामन्याचे आयोजन लाहोर आणि कराचीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो.  आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक आणि परदेशी खेळाडू सहभागी होता. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू यात सहभागी होतात. परंतु तरीही स्टेडिअम रिकामे आहेत. 

Updated: Feb 28, 2018, 05:58 PM IST
पाकिस्तान सुपर लीग :  ओस पडले स्टेडिअम, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली...  title=

नवी दिल्ली :  गेल्या २३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL 3) दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलच्या तीन सामन्याचे आयोजन लाहोर आणि कराचीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो.  आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक आणि परदेशी खेळाडू सहभागी होता. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू यात सहभागी होतात. परंतु तरीही स्टेडिअम रिकामे आहेत. 

दुबईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती आहे, परंतु, या स्पर्धेत प्रेक्षकांचा दुष्काळ पडला आहे. यामुळे भारतीय फॅन्सने सोशल मीडियावर पाकिस्तान सुपर लीगबाबत जबरदस्त खिल्ली उडवली आहे. 

या स्पर्धेत  इंग्लंडचा केवीन पीटरसन, इयॉन मॉर्गन, एलेक्स हेल्स आणि जेसन रॉय यांच्यासह बांगलादेशचा तमीम इकबाल, शाकिब अल हसन आणि महमुदुल्लाह आणि ऑस्ट्रेलियाचा वॉटसन आणि क्रिस लिनचा समावेश आहे. तसेच वेस्ट इंडिजकडून सुनील नारायण, आंद्रे रसेल, सॅमुअल बद्री, ड्वेन ब्रावो आणि किरन पोलार्ड आणि न्यूझीलंडचा मॅक्युलम आणि ल्यूक रोंकी यांचा समावेश आहे. 

 

 

 

पीएसएल सीझन ३ साठी एकूम ३० सामने होणार आहेत. हे सामने एकूण ६ संघात होणार आहेत. त्यात पेशावर जालमी, मुल्तान सुल्तान, क्वेटा ग्लैडिएटर्स, इस्लामाबाद यूनाइटेड, कराची किंग्स आणि लाहोर क्वालैंडर्स यांचा समावेश आहे. २५ मार्चपर्यंत हे सामने होणार आहेत. यात फायनल कराचीत खेळली जाणार आहे.