मुंबई : विराट कोहली हे नाव क्रिकेट मैदानावर जितकं लोकप्रिय आहे तितकेच ते नाव फॅशन इंडस्ट्रीमध्येही चर्चेत असते.
विराटच्या खेळातील फॉर्मसोबतच त्याच्या स्टाईलचीही सतत चर्चा होत असते.
आत्तापर्यंत हेअरस्टाईल, टॅटू, सिक्स पॅक अॅब्स यामुळे विराट कोहली चर्चेचा विषय बनला होता. मात्र नुकताच एअरपोर्टवर विराट कोहली महागड्या वॉलेटसोबत दिसला. Louis Vuitton Zippy XL चे काळ्या रंगाचे वॉलेट विराटकडे आहे.
विराट कोहलीकडे असलेल्या वॉलेटची किंमत ऐकून तुम्ही आवाक व्हाल. या वॉलेटची किंमत $ 1,250 म्हणजेच भारतीय किंमतीनुसार या वॉलेटची किंमत 81,144 रूपये होती.