आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं जोरदार स्वागत

आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ सोमवारी मायदेशी परतला. दिल्ली विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय हॉकी संघाने दहा वर्षांनंतर अंतिम फेरीत मलेशियाला हरवले.

Updated: Oct 23, 2017, 04:46 PM IST
आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं जोरदार स्वागत title=

नवी दिल्ली : आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ सोमवारी मायदेशी परतला. दिल्ली विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय हॉकी संघाने दहा वर्षांनंतर अंतिम फेरीत मलेशियाला हरवले.

विमानतळ आगमनानंतर संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू सरदारा सिंह म्हणाले, "आमचा संघ संपूर्ण टुर्नामेंटमध्ये विजयी राहिला. यामुळे खेळाडुंना विश्वास वाढला. 

भारतीय संघाने रविवारी ढाका येथे आशिया कप फायनलमध्ये मलेशियाचा 2-1 असा पराभव केला होता.