सिडनी : यंदाच्या वर्षी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 IPL 2020 मध्ये बंगळुरूच्या संघाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहल या खेळाडूनं दमदार प्रदर्शन केलं. आपल्या फिरीका गोलंदाजीच्या बळावर Australia ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो अशीच काहीशी कामगिरी करेल अशा क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा होत्या. पण, सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात युझीनं नको तोच विक्रम आपल्या नावे नोंदवला.
India भारतीय संघातील या लेगस्पिनरनं 10 षटकांमध्ये 89 धावा देत एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही फिरकी गोलंदाजानं इतक्या धावा विरोधी संधाला देण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
स्वत:चीच आकडेवारी मोडीत काढत त्यानं हा नको तो विक्रम रचला. यापूर्वी त्यानं 2019 मध्ये विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरोधातील सामन्यात 88 धावा देत अशीच काहीशी कामगिरी केली होती.
पहिल्या दोन षटकांमध्ये 11 धावा दिल्यानंतर युझीनं तिसऱ्या षटकात 13 धावा ऑस्ट्रेलिया संघाला देऊ केल्या. ऍरॉन फिंचला त्याचं 17 वं शतक झळकावू दिल्यानंतर मात्र चहलचा संघर्ष स्पष्टपणे दिसू लागला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झोडपलं...
डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा भारताविरोधातील सामन्यात धावांचा डोंगर रचला. ऍरॉन फिंचनं या सामन्यात वैयक्तिक 17 वं आणि भारताविरोधातील चौथं शतक झळकावलं. तर, लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या स्मिथनं अवघ्या 36 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. मॅक्सवेलही खेळपट्टीवर आला आणि 19 चेंडूंमध्ये 45 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पुढं नेली.