बांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.

Updated: Jun 14, 2017, 08:14 PM IST
बांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी. या मॅचआधी भारतीय संघ सरावासाठी मैदानात उतरला होता. सराव करताना भारतीय संघाचे सदस्य लाईट मूडमध्ये पाहायला मिळाले. शिखर धवन, विराट कोहली आणि युवराज सिंग यांनी मैदानात सराव करताना चक्क डान्स केला.

Add Zee News as a Preferred Source

पाहा भारतीय टीमच्या डान्सचा व्हिडिओ

 

दरम्यान  या मॅचसाठी रोहित शर्मा पूर्णपणे फिट असल्याची प्रतिक्रिया कॅप्टन विराट कोहलीनं दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना रोहितच्या पायाला दुखापत झाली होती.

याचबरोबर भारतीय संघामध्ये कोणतेही बदल करण्याचं कारण नसल्याचंही विराट कोहली म्हणाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फायनल ही भारत आणि इंग्लंडमध्ये व्हावी अशी फॅन्सची इच्छा असल्याचं वक्तव्य कोहलीनं केलं आहे.

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठी ही मॅच स्पेशल असणार आहे. ही मॅच युवराजची वनडे क्रिकेट करियरमधील तीनशेवी मॅच असेल. दरम्यान, कोणत्याही दबाव आणि दडपणाशिवाय बांगलादेशची टीम मैदानात उतरेल असा विश्वास कॅप्टन मश्रफी मुर्तजा यानं व्यक्त केलाय. 

About the Author