नवी दिल्ली : भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने आपला पहिला सराव सामना बोर्ड प्रेसिडेंट विरुद्ध खेळला. यात भारताकडून अनेक युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना विशाल स्कोअर करत सामना जिंकला. पण या सामन्यात अक्षय कानेश्वरने सर्वांचे मनं जिंकली.
हा स्पिनर एका ओव्हरमध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. या सामन्यात प्रेक्षकांनी एका वेगळ्याच प्रकारची गोलंदाजी पाहण्याचा अनुभव घेतला. अक्षय हा असामान्य अॅक्शन आणि व्हेरिएशनमुळे एक विकेट मिळाली.
अक्षय एक उद्योन्मुख खेळाडू आहे, त्याच्या या वेगळ्या शैलीमुळे त्याच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे.
आतापर्यंत त्याने १७ फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत तर १३ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ३४ आणि १० विकेट मिळविल्या आहेत.
सचिन तेंडुलकरला आपण नेहमी उजव्या हातांनी गोलंदाजी करताना पाहिले आहे. पण खरं म्हणजे नेटमध्ये सचिन दोन्ही हातांनी गोलंदाजी करायचा. त्याने आपले हे कौशल्य मॅचमध्ये वापरले नाही. पण अक्षयने आपले स्किल मॅचमध्ये वापरले आहे. आता भविष्यात आता क्रिकेटमध्ये असे नवनवीन प्रयोग केले जाती.