T20 World Cup 2021 मध्ये निवड, मात्र आयपीएलमध्ये फ्लॉप, या 4 खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ

या खेळाडूंना आयपीएलमध्ये (IPL 2021) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Updated: Sep 27, 2021, 09:27 PM IST
 T20 World Cup 2021 मध्ये निवड, मात्र आयपीएलमध्ये फ्लॉप, या 4 खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) अवघे काही दिवस बाकी आहे. या वर्ल्ड कपसाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या 15 सदस्यीय आणि 3 राखीव खेळाडूंची घोषणा करण्यात आली. या खेळाडूंना त्यांनी कामगिरीच्या जोरावर त्यांना संघात स्थान देण्यात आलं. मात्र या 15 खेळाडंमधून काही मुख्य आणि प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या मोसमात सपशेल अपयशी ठरतायेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली. (Indian team for T20 World Cup 2021 Suryakumar Yadav Rahul Chahar Ishan Kishan and Hardik Pandya's disappointing performance in IPL 14th season)

या खेळाडूंना आयपीएलमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे टी 20 वर्ल्ड कपआधी हे खेळाडू दमदार कामगिरी करत होते. टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आयपीएलकडे रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातंय. मात्र हे खेळाडू अपयशी ठरत असल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे 4 खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya)

अपयशी ठरत असलेल्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या आघाडीवर आहे. हार्दिकने या 14 व्या मोसमात एकूण 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने केवळ 7.85 च्या सरासरीने आणि 110 च्या साधारण स्ट्राईक रेटने  55 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या मोसमात गोलंदाजीही केलेली नाही. हार्दिक पंड्याचा कामगिरीचा पडता आलेख हा टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.

इशान किशन (Ishan Kishan)

इशान किशनने या हंगामातील 8 सामन्यात 107 धावा केल्या आहेत. 28 हा त्याचा हाय स्कोअर आहे. इशान किशनने मागील मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 30 सिक्स लगावले होते. मात्र या 14 व्या मोसमात इशानला केवळ 3 सिक्स मारता आले आहेत. अद्याप तरी इशानला अपेक्षित धमाका करता आलेला नाही. 

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 13 व्या मोसमात शानदार कामगिरी केली. त्यानंतर त्याला टी 20 आणि वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली. सूर्याने या संधीचं सोनं केलं. सूर्याने त्याचा धडाका असाच कायम ठेवला. निवड समितीने विश्वास दाखवत सूर्याला टी 20 वर्ल्ड कपसाठी संधी दिली. 

मात्र त्यानंतर सूर्यकुमारला निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवता आलेला नाही. सूर्याने 10 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. या मोसमातील त्याचा 56 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. यामुळे सूर्यकुमारसमोर आता चांगली खेळी करण्याचं आव्हान असणार आहे. 

राहुल चाहर (Rahul Chahar)

राहुल चाहरही सपेशल अपयशी ठरतोय. त्याने या 14 व्या मोसमातील 10 सामन्यांमध्ये 12 विकेट्स धेतल्या आहेत. मात्र या दुसऱ्या टप्प्यातील 3 सामन्यात 1 विकेट घेतली आहे. 

या चारही खेळाडूंमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. चौघेही आक्रमक आहेत. मात्र हे खेळाडू आयपीएलमध्ये अपयशी ठरत असल्याने टीम इंइियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या चारही खेळाडूंसमोर आयपीएलमध्ये आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करुन निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान असणार आहे.