भारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण

 त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली. 

Updated: May 27, 2018, 04:11 PM IST
भारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण title=

मुंबई : आयपीएलचा दूसऱ्या क्वालीफायर सामन्यामध्ये हैदराबादने कोलकात्यावर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. कोलकात्याने चांगली गोलंदाजी करत हैदराबादला रन्स करण्यापासून रोखून धरलं होतं. 19 वर्षीय अफगानिस्तानच्या या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कोलकात्याच्या 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याची कामगिरी पाहून अनेक जण हैराण झाले. संघाला गरज होती तेव्हा राशिद खानने चांगली बॅटींग आणि बॉलिंग करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली. त्याचा हा अॅवॉर्ड त्याने अफगाणिस्तान स्फोटात मारल्या गेलेल्यांना समर्पित केलाय. हे अॅवॉर्ड जलालाबादमध्ये एका क्रिकेट मॅच दरम्यान झालेल्या स्फोटात मारल्या गेलेल्यांना समर्पित असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

८ जण ठार 

एक आठवडाआधी अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात दहशतवाद्यांनी जोरदार बॉम्बस्फोट घडवून आणला. जलालाबाद राशिद खानचे देखील होमटाऊन आहे. यामध्ये ८ लोकांचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले होते. रमजान सुरू झाल्यानंतरचा अफगाणिस्तानवरचा हा पहिला हल्ला होता.

राष्ट्राध्यक्षांनी केल कौतूक 

राशिद खानने आपल्या कामगिरीने सगळ्यानाच प्रभावित केलं आहे. बॉलिंग असो, बॅटींग असो की फिल्डींग सगळ्याच फॉरमॅटमध्ये त्याने आपली कामगिरी दाखवली. भारतीय क्रिकेट फॅन्स त्याला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत यावरुनच अंदाज येऊ शकतो की त्याची कामगिरी किती शानदार होती.अफगानिस्तानचे राष्ट्रध्यक्ष अशरफ गनी यांनी देखील राशिदचं कौतूक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अफगानच्या या हिरोचा मला अभिमान आहे. मी माझ्या भारतीय मित्रांना धन्यवाद देतो की त्यांनी त्याला संधी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत राशिदने बद्दल त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पुढे म्हटलं की, राशिद क्रिकेट जगतातील संपत्ती झाला आहे.