हैदराबाद : हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईची टीम त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय मैदानात उतरली आहे. कंबरेला दुखापत झाल्यामुळे धोनीनं या मॅचमध्ये आराम करण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या ऐवजी सुरेश रैनाकडे चेन्नईचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. धोनी मैदानात न उतरल्यामुळे काही काळ भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं. कारण आगामी वर्ल्ड कपसाठी धोनी भारताचं महत्त्वाचं अस्त्र आहे. पण धोनीची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं रैनाने सांगितलं आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जीवात जीव आला.
'धोनीच्या पाठीला झालेली दुखापत फारशी गंभीर नाही, पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून आम्ही त्याला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला आहे,' असं रैना टॉसवेळी म्हणाला.
एमएस धोनीऐवजी चेन्नईनं इंग्लंडच्या सॅम बिलिंग्सला संधी दिली आहे. तर न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर मिचेल सॅण्टनरऐवजी लेग स्पिनर करण शर्माची अंतिम-११ खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे.
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये विजय झाला तर चेन्नईच्या टीमचा जवळपास प्ले ऑफमधला प्रवेश निश्चित होईल. दुसरीकडे हैदराबादच्या टीमला मागच्या ३ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मॅचमध्ये विजयाची गाडी पुन्हा ट्रॅकवर आणण्याचं आव्हान हैदराबादपुढे असेल.
फॅप डुप्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना (कर्णधार), अंबाती रायुडू, सॅम बिलिंग्स, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर
डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन (कर्णधार), विजय शंकर, युसुफ पठाण, दीपक हुड्डा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम