IPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ

प्ले-ऑफच्या 1 जागेसाठी 3 टीममध्ये चढाओढ 

Updated: May 4, 2019, 02:27 PM IST
IPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ title=

मोहाली : आयपीएलचे यंदाचे पर्व अखेरच्या टप्प्यात पोहचले आहे. प्लेऑफसाठी तीन टीमने आधीच प्रवेश केला आहे. उर्वरित एका जागेसाठी आता हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थान या टीममध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

3 मे ला पंजाब विरुद्ध कोलकाता यांच्यात सामना खेळण्यात आला. यामध्ये कोलकाताने  पंजाबवर 7 विकेटने विजय मिळवला. यामुळे पंजाब प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. तसेच कोलकाताच्या या विजयामुळे हैदराबादच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

कोलकाताच्या या विजयासह प्ले-ऑफच्या स्पर्धेत कायम आहे. याआधी चेन्नई, दिल्ली आणि मुंबई या टीमने प्ले-ऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. या तीन्ही टीमचे पॉईंट क्रमश: 18, 16-16 असे आहेत. 

यानंतर हैदराबाद आणि कोलकाता अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही टीमचे १२ पॉईंट्स आहेत. परंतु हैदराबादचा नेटरनरेट +0.653 इतका आहे. जो की कोलकाताच्या तुलनेत कित्येक पट चांगला आहे. त्यामुळे हैदराबाद अकंतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाताचा नेटरनरेट +0.173 इतका आहे.

प्ले-ऑफसाठीच्या एका जागेसाठी फार चुरस पाहायला मिळत आहे. जागा १ आणि दावेदार टीम ३ आहेत. हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थान. यापैकी केवळ १ टीमचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित आहे. तो देखील या 3 टीमच्या पराभवावर म्हणजेच जर-तरच्या समीकरणावर अवंलबून आहे.

या तीन्ही टीमचे प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता आहेत. परंतु हे पुढील तीन शक्यतांवर अवंलबून आहे. काय आहेत त्या शक्यता पाहुयात. 

हैदराबाद : हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात आज (4 मे) ला सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात हैदराबादचा विजय झाला तर हैदराबादचे जवळपास प्ले-ऑफसाठीचे दरवाजे खुले होतील. कारण कोलकाता आणि राजस्थान यांच्यात तुलनेत राजस्थानचा चांगला असलेला नेटरनरेट. हैदराबादचे स्टार खेळा़डू डेव्हिड वॉर्नर आणि जॉन बेअरेस्टो हे वर्ल्ड कपच्या सरावासाठी मायदेशी परतले आहे. त्यामुळे हैदराबादची टीम थोड्या प्रमाणात कमजोर पडली आहे.

कोलकाता : कोलकाता आपली पुढील मॅच मुंबई विरुद्ध 5 मे रोजी रविवारी खेळणार आहे. ही मॅच वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. याआधी २८ एप्रिलला खेळण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा 34 रनने पराभव केला होता. कोलकाताला मुंबईविरुद्ध होणाऱ्या या मॅचमध्ये विजय मिळवून चालणार नाही. हैदराबादच्या पराभवानंतर कोलकाताचा प्ले-ऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे हैदराबादच्या जय-पराजयावर कोलकाताचे प्ले-ऑफचे समीकरण अवलंबून आहे. 

आज (4 मे)  बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात मॅच खेळली जाणार आहे. त्यामुळे जर हैदराबादने ही मॅच जिंकली तर कोलकाताचा 5 मे रोजी मुंबई विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवूनही त्याचा फायदा होणार नाही. कारण हैदराबादच्या तुलनेत कोलकाताचा नेटरन रेट कमी आहे.

राजस्थान : राजस्थान अंकतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थान यंदाच्या पर्वातील शेवटचा सामना आज (4 मे) दिल्ली विरुद्ध खेळणार आहे. राजस्थानने आजचा सामना जिंकला आणि हैदराबाद आणि कोलकाताचा पराभव झाला तर राजस्थानला सरळ प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळेल.