IPL 2019: चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, मुंबईच्या टीममध्ये दोन बदल

आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकला आहे. 

Updated: Apr 3, 2019, 07:52 PM IST
IPL 2019: चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, मुंबईच्या टीममध्ये दोन बदल

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकला आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. मिचेल सॅण्टनरच्याऐवजी मोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर मुंबईच्या टीममध्ये दोन बदल आहेत. मिचेल मॅकलेनघनऐवजी ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरनड्रॉफला आणि मयंक मार्कंडेच्याऐवजी राहुल चहरला संधी देण्यात आली आहे. मयंक मार्कंडे फिट नसल्यामुळे राहुल चहरची निवड करण्यात आल्याचं रोहित शर्मा टॉसवेळी म्हणाला.

मुंबईची अडखळत सुरुवात

यंदाच्या मोसमात मुंबईची सुरुवात अडखळत झाली आहे. दिल्लीविरुद्धची पहिली मॅच गमावल्यानंतर मुंबईचा बंगळुरूविरुद्ध पराभव झाला. यानंतर पंजाबने मुंबईला हरवलं. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सध्या सातव्या क्रमांकावर आहे.

एकीकडे मुंबईची सुरुवात खराब झालेली असतानाच चेन्नईने मात्र त्यांच्या तीन पैकी तीन मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहा पॉईंट्स सह पहिल्या क्रमांकावर आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा, राहुल चहर, जसप्रीत बुमराह

चेन्नईची टीम

अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी, केदार जाधव, ड्वॅन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, दीपक चहर, मोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहिर

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा