IPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट

भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Updated: Aug 29, 2020, 05:09 PM IST
IPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट title=

दुबई : भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. आयपीएलच्या टीमशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांच्या एकूण १,९८८ आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमधून २ खेळाडूंसह १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी चेन्नईच्या टीमचे १३ सदस्य कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. 

या कोरोना टेस्टमध्ये जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्यामध्ये भारतीय टीममधला एक टी-२० स्पेशलिस्ट बॉलर आहे, तर दुसरा भारत ए कडून खेळणारा वरच्या फळीतला बॅट्समन आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंच्या नावाचा खुलासा केलेला नाही. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आलेल्या १३ लोकांच्या जे संपर्कात आले, त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत नाहीयेत. आयपीएलच्या मेडिकल टीमकडून त्यांची काळजी घेतली जात आहे. 

२० ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान युएईमध्ये १,९८८ आरटी-पीसीआर कोविड-१९ टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये खेळाडू, सहयोगी सदस्य, बीसीसीआय सदस्य, आयपीएल सदस्य, हॉटेल आणि स्टेडियमशी जोडली गेलेली माणसं यांच्यावर या टेस्ट करण्यात आल्या. पॉझिटिव्ह आलेल्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतर टेस्ट निगेटिव्ह आली, तरच त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.