IPL 2020: आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात रंगणार पहिला आहे.

Updated: Sep 6, 2020, 07:28 PM IST
IPL 2020: आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 चे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आयपीएलच्या 13 व्या सत्राची सुरुवात 19 सप्टेंबरपासून अबूधाबी येथे होईल. उद्घाटन सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात रंगणार आहे.

ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 53 दिवस चालेल. 10 नोव्हेंबरला आयपीएल फायनल होईल. यावेळी आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) खेळले जातील.

आयपीएलमध्ये एकूण 10 डबल हेडर सामने होतील. भारतीय समयानुसार पहिला सामना दुपारी 3:30 वाजता तर दुसरा सामना 7:30 वाजता सुरु होईल. आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला डबल हेडर सामना 3 ऑक्टोबर 2020 होणार आहे.

कोरोनामुळे यंदा आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. यूएईच्या 3 मैदानांमध्ये एकूण 60 सामने होणार आहेत. दुबईच्या मैदानात 24 सामने, अबुधाबीमध्ये 20 सामने, शारजाहमध्ये 12 सामने होणार आहेत.