IPL 2020 : विराटच्या स्लेजिंगला मनिष पांडेने असं दिलं उत्तर

विराटकडून पुन्हा एकदा स्लेजिंगला प्रयत्न फसला

Updated: Nov 7, 2020, 06:31 PM IST
IPL 2020 : विराटच्या स्लेजिंगला मनिष पांडेने असं दिलं उत्तर

अबुधाबी : विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा प्रवास आयपीएल 2020 मध्ये हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर संपला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 131 धावा केल्या. आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता नाही आली. ज्यामुळे हैदराबादने त्यांचा 6 विकेट्सने पराभव करून विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केले.

दुसर्‍या डावात अशी वेळ आली की जेव्हा आरसीबीला असे वाटले की हा खेळ सामन्यावर त्यांची पकड येऊ शकते. परंतु हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि जेसन होल्डर यांनी चांगली कामगिरी केली आणि विजय मिळवला. पाचव्या विकेटसाठी 65 धावांच्या नाबाद भागीदारीमुळे हैदराबादचा विजय सोपा झाला. आता हैदराबादला दुसर्‍या क्वालिफायरमध्ये 8 नोव्हेंबरला दिल्ली कॅपिटलच्या विरूद्ध मैदानात उतरावे लागणार आहे.

हैदराबादने धावा जमवण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिली विकेट लवकरच गमावल्यानंतर संघ थोडासा दबावात आला. यामुळे संघाची सुरुवात थोडी संथ झाली. हैदराबादचा फलंदाज मनीष पांडे क्रिजवर असताना कोहलीकडून स्लेजिंगचा प्रयत्न झाला. पण त्याला मनिष पांडेने बॅटने उत्तर दिलं.

मनीष पांडे सावधपणे खेळत असताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याला उकसवण्याचा प्रयत्न केला. विराटच्या स्लेजिंगनंतर त्याने सिक्स मारत कोहलीला शांत केले.

विराटची ही युक्ती या लीगमध्ये दुसऱ्यांदा अपयशी ठरली. गेल्या आठवड्यात विराटने मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवला देखील उकसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने 43 बॉलमध्ये 79 धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. मनीष पांडे आरसीबीविरूद्ध मोठा डाव खेळू शकला नाही, परंतु त्याने 21 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं.