IPL 2021 RCB vs PBKS: विराट आणि मॅक्सवेलची विकेट काढताच बल्ले बल्ले!

तीन मोठ्या फलंदाजांच्या विकेट्स काढल्यानंतर विराट कोहलीनं सामना संपल्यावर या बॉलरची पाठ थोपटली आहे.

Updated: May 1, 2021, 10:16 AM IST
IPL 2021 RCB vs PBKS: विराट आणि मॅक्सवेलची विकेट काढताच बल्ले बल्ले!   title=

मुंबई: पंजाब किंग्स संघाला बंगळुरू संघाच्या विजयी घोडदौडला लगाम घालण्यात यश मिळालं आहे. यावेळी पंजाब संघातील एक बॉलरनं महत्त्वाच्या तीन विकेट्स काढल्या आहेत. कोहली आणि मॅक्सवेलला तंबुत धाडून त्याने मोठी कामगिरी केली. तर दुसरीकडे सामना संपल्यानंतर कोहलीनं देखील त्याची बॉलिंग पाहून कौतुकानं पाठ थोपटली आहे. 

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 26 वर्षीय बॉलरनं सामन्यातील बाजी पलटवली आणि चर्चेचा विषय ठरला. पंजाबच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे. 

स्पिनर हरप्रीत बरारला तीन सामन्यांनंतर आता एकच सामन्यात तीन विकेट्स घेण्यात  मोठं यश मिळलं आहे. कोहली आणि मॅक्सवेलची विकेट घेतल्यानंतर हरप्रीतने बल्ले बल्ले डान्सही मैदानात केला. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना तंबुत धाडण्यात हरप्रीतचा मोठा वाटा आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

हरप्रीत आणि बिश्नोई यांनी सामन्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्याची ही कामगिरी पाहून सामना संपल्यानंतर कोहली देखील खूश झाला आणि कौतुकानं त्याची पाठ थोपटल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हरप्रीतने तीन विकेट्स घेतल्यानंतर त्याचं संघात खूप कौतुक देखील झालं.

बंगळुरू संघ 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कर्णधार विराट कोहलीला आऊट करण्यात यश आलं. मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स एकहाती खेळून सामन्यातील बाजी पलटवू शकतात हे माहिती होतं. मात्र त्यांनाही हरप्रीतनं एक एक करत तंबुत धाडलं. या यशानंतर त्याने मैदानात बल्ले बल्ले करत सेलिब्रेशन देखील केलं आहे.