IPL 2021 Suspend: भारत सोडताच जोसभाई झाला भावुक! शेअर केला फोटो

राजस्थान रॉयल्स संघातून खेळणारा इंग्लंडचा खेळाडू जोस बटलर याने एक भावुक मेसेज चाहत्यांसोबत शेअर केला.

Updated: May 6, 2021, 05:17 PM IST
IPL 2021 Suspend: भारत सोडताच जोसभाई झाला भावुक! शेअर केला फोटो title=

मुंबई: वाढत्या कोरोनाचा परिणाम IPL 2021वरही झाला. IPLसंघातील खेळाडू ते कोचपर्यंत कोरोनाने गाठलं आणि त्यामुळे IPLमध्येच स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली. देशात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे IPLस्थगित झालं आणि सर्वांना आपल्या कुटुंबासोबत घरी जाण्याच्या सूचना BCCIने दिल्या आहेत. प्रत्येकजण मैदान सोडून जाताना थोडा भावुक झाला मात्र परिस्थितीही तेवढीच गंभीर आहे यांचं भानही सर्व खेळाडूंना होतं. 

जोस बटलरनं आपल्या ट्वीटरवर काही खास फोटो शेअर करत भावुक मेसेज लिहिला आहे. हा मेसेज वाचून तुमचेही डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत. राजस्थान रॉयल्सतील तुफानी फलंदाज आणि इंग्लंडचा विकेटकीपर जोस बटलर याने अनेकदा आपल्या बोलण्यातून भारताबद्दल असणारं प्रेम व्यक्त केलं आहे. 

घरी परतत असताना पुन्हा एकदा बटलरने सोशल मीडियावर आपले मन मोकळे केले आहे. बटलर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारत हा एक विशेष देश आहे, जो या क्षणी कठीण परिस्थितीतून जात आहे. आपण नेहमी प्रमाणे माझे आणि माझ्या कुटुंबाचे स्वागत केल्याबद्दल खूप धन्यवाद. सुरक्षित रहा आणि स्वत: ची काळजी घ्या.'

जोस बटलरसाठी आयपीएल 2021 खूप खास होता. राजस्थान संघाने त्याचा वाढदिवस खूप छान पद्धतीनं साजरा केला. जोस बटलरला सर्वांनी  जोसभाई असंही टोपणनाव दिलं.  त्याशिवाय आयपीएल पुढे ढकलण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने शानदार शतकही झळकावले.