IPL 2021: आंद्रे रसेलमुळे गंभीर जखमी झाला असता दिनेश कार्तिक, पण थोडक्यात...

IPLआधी रसेलमुळे गंभीर जखमी झाला असता दिनेश कार्तिक, पाहा नेमकं काय घडलं

Updated: Apr 4, 2021, 01:19 PM IST
IPL 2021: आंद्रे रसेलमुळे गंभीर जखमी झाला असता दिनेश कार्तिक, पण थोडक्यात... title=

मुंबई: IPLआधी कोलकाता नाईट रायडर्समधील नुकताच रिंकू सिंह जखमी झाल्यानं खेळणार नाही. त्याच वेळी आणखी एक धक्का बसता बसता थोडक्यात निभावलं आहे. IPLआधी दिनेश कार्तिकला गंभीर दुखापत होता होता थोडक्यात निभावल्यानं KKRसंघानं सुटकेचा निश्वास टाकला. 

कोलकाता नाइट राइडर्स संघाचा डी वाय पाटील स्टेडियमवर सराव सुरू आहे. या सरावादरम्यान आंद्रे रसेलनं तुफान शॉट लगावला. त्याच वेळी समोर असलेल्या दिनेश कार्तिकला हा चेंडू जोरात बसणार तेवढ्यात त्यानं युक्ती लढवत तो चुकवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ केकेआर संघानं आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे.

                    Andre

आंद्रे रसेलचा शॉट इतक्या जबरदस्त वेगवान होता की त्यामुळे कार्तिकला गंभीर दुखापत होऊ शकली असती. कार्तिकने नॉन-स्ट्रायकर एंडवर युक्ती लढवत हा चेंडू चुकवला. त्यामुळे थोडक्यात निभावलं आहे. आंद्रे रसेलच्या धोकादायक शॉटपासून स्वत: ला वाचवले. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या टीमने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

9 एप्रिलपासून IPL सुरू होत आहे. या IPLमध्ये पहिला सामना KKR 11 एप्रिलला खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादसोबत हा सामना खेळण्यात येणार आहे. याआधी रिंकू सिंहला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही. त्याऐवजी संघामध्ये गुरकीरत सिंह मानला संधी देण्यात आली आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x