IPL 2021: मॉडेल इतकीच सुंदर नितीश राणाची पत्नी, बोल्ड लूक पाहून व्हाल थक्क

नितीश राणाने मैदानात काढून दाखवलेल्या हातील रिंगनंतर त्याने अर्धशतक पत्नीला समर्पित केल्याचं सांगितलं जात आहे. नितीश राणाची पत्नी कोण आहे तिच्याबद्दल जाणून घ्या

Updated: Apr 12, 2021, 05:45 PM IST
IPL 2021: मॉडेल इतकीच सुंदर नितीश राणाची पत्नी, बोल्ड लूक पाहून व्हाल थक्क

मुंबई: IPLमधील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद असा रंगला. 10 धावांनी कोलकात संघानं हैदराबाद संघावर विजय मिळवला आहे. नुकताच पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरू असताना नितीश कुमारची पत्नीही चर्चेत आली आहे.

नितीश कुमारनं आपलं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मैदानात हातातील रिंग दाखवली होती. त्यामुळे हे अर्धशतक राणानं पत्नीला समर्पित केल्याचं सांगितलं जात आहे. नितीश राणाची पत्नी मॉडेल इतकीच खूप सुंदर आहे. तिचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

नितीश राणाची पत्नी साची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझाइनर आहे. नितीश आणि साचीने फेब्रुवारी 2019मध्ये लग्न केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ❥ Saachi Marwah Rana ❥ (@saachi.marwah)

नितीश आपल्या दमदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. साची हिची कारकीर्द 2015 मध्ये सुरू झाली. तिने अंसल विद्यापीठाच्या सुशांत स्कूल ऑफ डिजाइन इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. साचीने अनेक नामांकित इंटिरियर डिझाइनर्सकडून प्रशिक्षणही घेतलं आहे.

नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीनं केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे त्यांचं खूप कौतुक होत आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघानं हैदराबादवर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. इतकच नाही तर IPLच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्यांनी 100 वा सामना जिंकला आहे. त्याचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. चेपॉक स्टेडियमवर उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना रंगणार आहे.