IPL 2021, CSK vs KKR: ...आणि सुरेश रैनानं हरभजन सिंगचे धरले पाय, व्हिडीओ

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यादरम्यान सुरेश रैनानं असं काही केलं की हरभजन सिंगने त्याला कडकडून मिठी मारली पाहा व्हिडीओ

Updated: Apr 23, 2021, 11:50 AM IST
IPL 2021, CSK vs KKR: ...आणि सुरेश रैनानं हरभजन सिंगचे धरले पाय, व्हिडीओ title=

मुंबई: आयपीएलच्या 2021 या हंगामात अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. कधी गुरू शिष्य आमनेसामने आले तर कधी फॅन असलेल्या विरुद्ध संघातील खेळाडूनं आपल्या जर्सीवर ऑटोग्राफ घेतली. दोन संघातील खेळाडू आपापसात एकमेकांशी मैदानात सल्लामसलत करताना देखील दिसले. याच दरम्यान नुकत्याच झालेल्या एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोघांचा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कोलाकाता विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यादरम्यान सुरेश रैनानं हरभजन सिंगचे पाया पडून आशीर्वाद घेतले. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हरभजन सिंगने त्याला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली.

सुरेश रैना मधील हरभजन सिंगबद्दल इतका आदर पाहून माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, 'हा खूप सुंदर क्षण आहे. जेव्हा आपण बर्‍याच वर्ष एकत्र खेळता, विश्वचषक जिंकला, तेव्हा एक प्रेम आहे. भज्जी रैनापेक्षा जास्त ज्येष्ठ नसला तरी दोघेही संघात होते.

या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश रैना आणि भज्जीचा एकमेकांसाठी असलेलं  प्रेम आणि आदर या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला आहे.