KKR vs DC | संयमी आश्विन इयॉन मॉर्गन आणि टीम साऊदीला भर मैदानात भिडला, नक्की काय घडलं?

 मैदानात नेहमीच शांत असलेला ऑलराऊंडर आर अश्विन (R Ashwin) संतापलेला दिसून आला.   

Updated: Sep 28, 2021, 06:22 PM IST
KKR vs DC | संयमी आश्विन इयॉन मॉर्गन आणि टीम साऊदीला भर मैदानात भिडला, नक्की काय घडलं?

शारजा : बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून अवघ्या 127 धावा केल्या. दिल्लीच्या डावातील 20 व्या ओव्हरदरम्यान मैदानात हायव्होलटेज ड्रामा झाला. मैदानात नेहमीच शांत असलेला ऑलराऊंडर आर अश्विन (R Ashwin) संतापलेला दिसून आला.अश्विन कोलकाताचा कर्णधार इयोन मॉर्गन (Eoin Morgan) आणि बोलर टीम साऊथीला (Tim Southee)) भिडला.  (ipl 2021 kkr vs dc ravichandran ashwin clashes with kolkata captain eoin morgan and tim southee)

अश्विन इतका संतापला होता की पंच आणि इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

नक्की काय झालं? 

सामन्यातील शेवटची ओव्हर टीम साऊथीने टाकली. या 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने डीप स्केवअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारला. पण अश्विन मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. डीप स्केवअरला असलेल्या  नीतिश राणाने अश्विनचा कॅच पकडला. अश्विन आऊट झाला. 

या दरम्यान साऊथीने अश्विनची कळ काढली. हे मात्र अश्विनला काही पटलं नाही. यावरुन अश्विन संतापला. अश्विन साऊथीला सुनावत होता.

तितक्यात कॅप्टन इयोन मॉर्गन आला. अश्विन मॉर्गनसोबतही भिडला.प्रकरण वाढतंय असं दिसताच केकेआरचा विकेटकीपर दिनेश कार्तिक आणि पंचांनी मध्यस्थी केली. दिनेशने अश्विनला मागे पाठवत समजूत घातली. या सर्व प्रकारामुळे शांत आणि संयमी अश्विनचा आक्रमक रुप क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला. 

अश्विन आणि कोलकाताच्या खेळाडूंमध्ये झकाझकी