एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल

विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.

Updated: Apr 14, 2021, 05:12 PM IST
एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल

चेन्नई: मुंबई इंडियन्स विरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात झालेला पराभव कोलकाता नाईट रायडर्ससाठी अत्यंत वेदनादायक होता. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.

हिरो ठरलेला आंद्रे रसेल आता विलन झाला

आंद्रे रसेलने मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग दरम्यान अवघ्या 2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतले, पण जेव्हा कोलकाताची बॅटिंगची वेळ आली, तेव्हा मात्र आंद्रे रसेलने 15 बॅालमध्ये 9 धावां करत बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर आंद्रे रसेलला जोरदार ट्रोल केले जात आहे. आंद्रे रसेलच्या मजेदार मीम्स ट्विटरवर व्हायरल होत आहेत.

आंद्रे रसेल खलनायक का झाला?

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. ट्रेंट बोल्टने या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. त्याने आंद्रे रसेल आणि पॅट कमिंसला बाद केले. दिनेश कार्तिकसारख्या बॅट्समॅनलाही शेवटच्या ओव्हरमध्ये आपला संघ जिंकवता आला नाही. आंद्रे रसेलकडून केकेआरला जिंकवण्याची अपेक्षा केली जात होती, परंतु सामना जिंकवणाराच सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
पाच वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रोमांचक विजय नोंदविला. मुंबई इंडियन्स टीम 152 धावांवर बाद झाल्यानंतर कोलकाता संघाकडून मॅच ओपनींगसाठी नितीश राणा आणि शुभमन गिल आले. त्यांच्या 72 धावांच्या भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवणे सोपे वाटत होते. परंतु नंतर राहुल चहरने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन कोलकाता नाईट रायडर्सला रोखुन आपले योगदान दिले. तर क्रृणाल पांड्याही गेम चेंजर ठरला.