मुंबई: हार्दिक पांड्याची मैदानात बॅट तुटल्याचं एका सामन्या दरम्यान समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाब विरुद्ध कोलकाता झालेल्या सामन्यात असाच काहीसा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं. पंजाबची फलंदाजी सुरू असताना कोलकाताच्या गोलंदाजाने घातक बॉल टाकला आणि बॉलसोबत बॅटही हवेत उडाली. मैदानातील सर्वजण हा प्रकार आश्चर्याने पाहात होते.
सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं?
कोलकाता विरुद्ध पंजाब झालेल्या या सामन्यात सुनील नरेनची बॉलिंग सुरू होती. तर फलंदाजीसाठी हेनरिक्स क्रिझवर होता. नरेननं गुगली बॉल टाकला आणि त्या त्याला मारण्याच्या नादात हेनरिक्सची बॅटही हातातून सुटून बॉलसोबत हवेत उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— Aditya Das (@lodulalit001) April 26, 2021
हा प्रकार 12व्या ओव्हरमध्ये घडला. त्यानंतर सर्वजण नेमकं काय आणि कसं घडलं हे आश्चर्यानं पाहात राहिले. मात्र त्या वेळात हेनरिक्सने बॅटविनाच रन काढायला सुरुवात केली. नरेनने पंजाबच्या दोन स्टार फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या आहेत. हा बॉल इतक्या वेगात होता की विकेटकीपर दिनेश कार्तिकही त्याला पकडण्यात अपयशी ठरला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध 9 विकेट्सनं दमदार विजय मिळवणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना कोलकाता विरुद्ध मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. ख्रिस गेल तर आल्या पावली तंबुत परला आहे. के एल राहुल 19, मयंक अग्रवाल 31 आणि निकोलस पूरन 19 धावा करण्यात यश आलं आहे. पंजाबच्या संघानं बड्या मुश्किलीने 123 धावा 9 गडी गमावून केल्या.
कोलकाता संघात इयोन मॉर्गनने दमदार खेळी केली. कोलकाता संघाने 16.4 ओव्हरमध्येत 126 धावा करत पंजाबवर 5 गडी राखून विजय मिळवला आहे.