IPL 2021 : MI VS RCB पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरुकडून पराभव

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कांटे की टक्कर

Updated: Apr 10, 2021, 12:09 AM IST
IPL 2021 : MI VS RCB पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरुकडून पराभव title=

चेन्नई : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा बंगळुरु संघाने पराभव केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 हंगामाला आजपासून सुरुवात झाली. ज्यामध्ये पहिला सामना हा मुंबई आणि बंगळुरु संघामध्ये चेन्नई येथे रंगला. पहिला सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. (Mi vs RCB)

नाणेफेक जिंकून बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. आधी बॅटींग करणाऱ्या मुंबईच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 धावा केल्या. 20 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन 2 गडी राखत बंगळुरु संघाने विजय मिळवला. (RCB win)

मुंबई विरुद्ध ओपनिंगसाठी वॉशिंग्टन सुंदर सोबत आज विराट कोहलीने सुरुवात केली. आजचा सामना देवदत्त पडिक्कल अस्वस्थ असल्याने खेळला नाही. क्रुणाल पांड्याने सुंदरला 10 धावांवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. पहिला सामना खेळणाऱ्या रजत पाटीदारला ट्रेंट बाउल्टने बोल्ड करून माघारी पाठवले. 33 धावांवर असताना विराट विराट कोहलीला जसप्रीत बुमराहने एलबीडब्ल्यू केले.

मॅक्सवेलची विकेट घेत मार्को जेन्सनने बंगळुरूला मोठा धक्का दिला. त्याने 28 बॉलमध्ये 39 रनची खेळी केली. 

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरली. पहिला झटका रोहित शर्माच्या रुपात लागला. खराब कॉलमुळे ती रनआऊट झाला. रोहितने 15 बॉलमध्ये 19 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये मुंबईने 41 धावा केल्या. त्याचबरोबर 9 ओव्हरपर्यंच लिन आणि सूर्यकुमार यांनी धावसंख्या 80 रन पर्यंत नेले. सूर्यकुमार यादवने 23 बॉलमध्ये 31 धावा केल्या. 35 बॉलमध्ये 49 रन करुन लिन आऊट झाला.

हार्दिक पांड्या 13 रनवर आऊट झाला. ईशान किशनने 19 बॉलमध्ये 28 रन केले. सहावा धक्का मुंबईला क्रुणाल पांड्याच्या रूपात लागला, त्याने 7 रन केले. सातवा विकेट पोलार्डच्या रुपात गेली. त्याने ही 7 रन केले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x