IPL2021 : Ishan Kishan चा हल्लाबोल... Sheikh Zayed Stadium मध्ये 6 आणि 4 ची बरसात

मुंबई इंडियन्सने फलंदाजीसाठी मैदानावर येताच धडाकेबाज सुरूवात केली आहे.

Updated: Oct 8, 2021, 08:27 PM IST
IPL2021 : Ishan Kishan चा हल्लाबोल... Sheikh Zayed Stadium मध्ये 6 आणि 4 ची बरसात title=

दुबई : मुंबई इंडियन्सने आज म्हणजेच शुक्रवारी टॉस जिंकून आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सला प्लेऑफला पोहोचण्यासाठी टॉस जिंकणे महत्वाचे होते, कारण मुंबईसाठी आज Do or Die अशी परिस्थिती ओढावली आहे. तसे पाहाता मुंबई टीमने टॉस जिंकूण पहिला टप्पा तर पार केला आहे परंतु त्यांची खरी अग्निपरीक्षा तर पुढे आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याने चाहत्यांच्या मनात मॅच जिंकण्याच्या इच्छा प्रबळ होत चालल्या आहेत, परंतु पुढील टप्पा पार करणे मुंबईसाठी महत्वाचे आहे.

ते दोन टप्पे जर मुंबईने पार केले तर जे आयपीएलच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं काहीसं आपल्याला पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्सने फलंदाजीसाठी मैदानावर येताच धडाकेबाज सुरूवात केली आहे. पहिल्यांदा सलामीसाठी रोहित आणि इशान किशन मैदानावर उतरले. मैदानावर उतरताच कसलाही विलंब न करता इशान किशनची बॅट बोलू लागली आहे, ज्यामुळे त्याने धडाकेबाज फटकेबाजीला सुरूवात केली आहे.

पाहता पाहता 4 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने 64 धावा केल्या, ज्यामध्ये इशान किशन ने फास्टेस्ट 50 करत आपलं योगदान दिलं. इशानने हे फास्टेस्ट 50 अगदी 16 बॉलमध्येपूर्ण केलं आहे.
आयपीएल सीजन 2021मध्ये 16 बॉलमध्ये 50 रन्स काढणारा इशान किशन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल ओव्हर ऑल सिजनमध्ये पाहाता इशान किशन हा फास्टेस्ट 50 करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

या पूर्वी के. एल राहूल ने 14 बॉलमध्ये 50 रन्स करुन फास्टेस्ट 50 पूर्ण केलं आहे, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये फास्टेस्ट 50 करणारा खेळाडूच्या लिस्टमध्ये पहिला आहे. त्यानंतर आता 16 बॉलमध्ये 50 रन्स करत इशान किशन फास्टेस्ट 50 करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

इशांतकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना आणि त्याच्याकडून सगळ्यांना फास्टेस्ट सेंच्यूरीची अपेक्षा होती, परंतु अखेर SRHच्या उमर मलीकने इशानची विकेट घेत त्याला पवेलियनमध्ये पाठवलं ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

इशानने 32 बॉलमध्ये 84 रन्स करत मुंबई इंडियन्ससाठी मोठी खेळी खेळली आहे.