मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलग तिसऱ्यांदा हैदराबाद संघाचा पराभव झाला आहे. आधी कोलकाता विरुद्ध त्यानंतर बंगळुरू विरुद्ध आणि आता मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात पराभव झाला आहे. या सामन्यात एक मोठी दुर्घटना होता होता टळली आणि हैदराबादचे खेळाडू अगदी थोडक्यात वाचले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू असताना जॉनी बेयरस्टो क्रिझवर होता. त्याची आक्रमक फलंदाजी सुरू होती. त्याने एक षटकार ठोकला जो जवळपास 99 मीटर लांब गेला. त्यादरम्यान बॉल फ्रीजवर जाऊन आपटला. हा बॉल इतक्या वेगात आपला की फ्रीजची काच फुटली.
— Aditya Das (@lodulalit001) April 17, 2021
या फ्रीजजवळ सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू होते. हे खेळाडू थोडक्यासाठी वाचले. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहून अंदाज येईल की अक्षरश: फ्रीजच्या काचेचा चुरा झाला आहे.
बेयरस्टोचा हा षटकार इतका जोरदार होता की डगआऊटजवळ ठेवलेल्या रेफ्रिजरेटरच्या काचेचे तुकडे झाले. बेयस्टोक्सनं ठोकलेल्या षटकाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याने 22 चेंडूमध्ये 43 धावा केल्या त्यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले.