MS Dhoni शेवटचं IPL खेळणार? नव्या जर्सीमधून भारतीय संरक्षण दलाला सॅल्युट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. 

Updated: Mar 25, 2021, 09:17 AM IST
MS Dhoni शेवटचं IPL खेळणार? नव्या जर्सीमधून भारतीय संरक्षण दलाला सॅल्युट title=

मुंबई: IPLचा हंगाम सुरू होत आहे. 9 एप्रिलपासून 30 मे पर्यंत 8 संघांमध्ये 6 शहरांत सामने खेळवले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही चेन्नई सुपरकिंग्सने यंदा आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. या जर्सीपेक्षा धोनीच्या जर्सीची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे. ही जर्सी आल्यानंतर धोनी यंदा शेवटचं IPL खेळणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. सीएकेने ट्वीट करून त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ही जर्सी धोनीनं खास आपल्यासाठी तयार करून घेतली आहे. माही या व्हिडीओमध्ये तामिळ भाषेत बोलताना दिसत आहे.

CSKच्या नव्या जर्सीमधून भारतीय संरक्षण दलाच्या सन्मान आणि प्रेरणा म्हणून कॅमॉफ्लॉज लावण्यात आला आहे. या जर्सीत फ्रेंचायजी असलेल्या लोकांच्या खांद्यावर तीन स्टार्स देण्यात आले आहेत. 2010, 2011 आणि 2018मध्ये IPL जिंकल्याचं हे प्रतिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय संरक्षण दलासाठी दिलेल्या सन्मानाप्रती चाहत्यांनी CSKचं कौतुक केलं आहे.

CSKचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला तर भारतीय संरक्षण दलाबाबत नितांत प्रेम आणि आत्मियता आहे. हे वारंवार माहीच्या वर्तनातून त्याच्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला दिसून येतं. CSKच्या या नव्या जर्सीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. माहीच्या संघाचं कौतुक केलं जात आहे.