तर माझी बायको घटस्फोट घेईल...... रिकी पॅान्टींग का घाबरतो बायकोला?

दिल्ली कॅपिटलचे मुख्य कोच रिकी पोंटिंगने शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल या आयपीएलच्या 2021व्या सीझनमधील पहिल्या सामन्यापूर्वी वक्तव्य केलं की, “....

Updated: Apr 13, 2021, 07:35 PM IST
तर माझी बायको घटस्फोट घेईल...... रिकी पॅान्टींग का घाबरतो बायकोला? title=

मुंबई : दिल्ली कॅपिटलचे मुख्य कोच रिकी पोंटिंगने शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल या आयपीएलच्या 2021व्या सीझनमधील पहिल्या सामन्यापूर्वी वक्तव्य केलं की, “.....तर माझी पत्नी मला घटस्फोट देईल.” तो असा का म्हणाला असावा? या मागचे काय कारण असावे असा प्रश्न सर्वच लोकांना पडला आहे.

रिकी पोंटिंगचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हीडिओ पाहूण त्याची तुलना 2007 मध्ये आलेल्या चक दे ​इंडिया या चित्रपटात शाहरुख खानने साकारलेल्या कबीर खान या पात्राशी केली आहे. चित्रपटात महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी, कबीर खाननेसुद्धा असेच काहीसे केले होते.

पहिल्या सामन्याच्या दिवशी दिल्ली कॅपिटलने पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये पॉन्टिंगला प्रश्न विचारला होता की, तो मॅच डे पर्यंत दाढी ठेवणार आहे का? परंतु त्यांने ते नाकारले, तो म्हणाला, "नाही मी नाही ठेवणार, कारण जर मी असे केले तर मला वाटते माझी बायको मला टेलिव्हिजनवर बघेल आणि तिने हे पाहिल्यास  ती मला घटस्फोट देईल."

“पुढच्या दोन दिवसात मी दाढी काढणार आहे. मॅचच्या दिवसापर्यंत मी याची खात्री देतो की, मी ती काढेन. तुम्ही लोकांनी हे नोटिस केलंत की, नाही मला माहित नाही परंतु प्रत्येक खेळाच्या आधील्या रात्री मी नेहमी दाढी करतो. त्यामुळे, 9 तारखेच्या रात्री (खेळाच्या आदल्या रात्री)मी दाढी करेन."

रिकी पॅान्टींगच्या अशा वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. त्याच्या सारखा खेळाडू आपला बायकोला इतका कसा घाबरतो? असाचं लोकांना प्रश्न पडला आहे.