IPL 2021: मॅच दरम्यान Ritika Sajdeh आणि Natasa Stankovic का झाले सरप्राईज? यामागचं कारण समोर

आयपीएल 2021 च्या 5 व्या सामन्यात 14 एप्रिलला मुंबई इंडियन्सने केकेआरला 10 धावांनी पराभूत केले.

Updated: Apr 15, 2021, 10:51 PM IST
IPL 2021: मॅच दरम्यान Ritika Sajdeh आणि Natasa Stankovic का झाले सरप्राईज? यामागचं कारण समोर title=

चेन्नई : आयपीएल 2021 च्या 5 व्या सामन्यात 14 एप्रिलला मुंबई इंडियन्सने केकेआरला 10 धावांनी पराभूत केले. सामना पूर्णपणे केकेआरच्या हातात होता, परंतु अखेरच्या 5 ओव्हरमध्ये हा सामना पूर्णपणे बदलून तो मुंबईच्या परड्यात पडला. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) सुद्धा हा सामना पहायला आल्या होत्या. त्या सामन्या दरम्यानच्या नताशा आणि रितिका दोघींचे आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिलेले फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

रितिका आणि नताशाला का धक्का बसला?

रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) यांची सरप्राईज रीएक्शनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु ते सरप्राईज होण्यामागचे कारण त्या दोघीं शिवाय कोणालाही माहिती नाही. मात्र, या दोघींच्या सरप्राईज रीएक्शन देण्यामागचे कारण काय होते, हे मुंबई इंडियन्सने मजेशीर पद्धतीने सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पहिला फोटो नताशा आणि रितिकाचा आहे तर दुसर्‍या फोटोमध्ये रोहित शर्मा बॅालिंग करताना दिसत आहे. रितिका आणि नताशाच्या या सरप्राईज रीएक्शनमागील कारण म्हणजे रोहित स्वतः बॅालिंग करायला आला आहे.

सामन्यात रोहित शर्माने एका ओव्हरसाठी बॅालिंग केली आणि त्याने या ओव्हरमध्ये 9 रन्स दिले. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये एक हॅटट्रिक आहे.

मुंबईने केकेआरकडून हिसकावली मॅच

मुंबईने प्रथम बॅटींग करताना 10 विकेट गमावून 152 धावा केल्या. तेव्हा केकेआरकडून आंद्रे रसेलने 5 बळी घेतले आणि तो केकेआर हीरो बनला. त्यानेतर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या केकेआरचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावल्यानंतर केवळ 142 धावा करू शकला. हा सामना काही काळ केकेआरच्या हातात होता पण शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार बॅलिंगकरत कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी केकेआरकडून ही मॅच हिसकावून घेतली.