दुबई: पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई झालेल्या सामन्यात के एल राहुलच्या वादळी खेळीसमोर चेन्नई संघाला नमतं घ्यावं लागलं. के एल राहुलने चेन्नईविरुद्ध अवघ्या 25 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. पंजाबसाठी सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम के एल राहुलने केला आहे. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे पंजाब संघात त्यांचं कौतुक होत आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील के एल राहुलचं खूप कौतुक केलं.
अभिनेत्री आणि पंजाबची ओनर प्रीती झिंटाने के एल राहुलसोबतचा फोटो ट्वीट करत त्याच्या पाठीवर थोपटून कौतुक केलं आहे. त्याच्या IPL 2021 14 व्या हंगामातील कामगिरीसाठी त्याचं कौतुक केलं. मात्र तरीही प्रीती झिंटाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. के एल राहुलचं कौतुक राहिलं बाजूलाच मात्र प्रीतीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय
केएल राहुलने 45 चेंडूत 98 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईविरुद्धचा सामना एकतर्फी आपल्या कौशल्याने जिंकला. राहुलने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या विजयावर, पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटाने ट्विट करून राहुलच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं.
Finally a game up to our potential What a knock by sadda captain @klrahul11 #CSKvsPBKS @PunjabKingsIPL @IPL pic.twitter.com/bNcWlOdFOa
— Preity G Zinta (@realpreityzinta) October 7, 2021
Pls change the entire management & coaching team
They can't even select a proper 11 after 2 seasons
Also messed up auctions by buying unwanted players for crores..#PBKS have a good indian core...
Make a good team out of them by picking right overseas players
— Universe BOSS (@gayle_boss) October 7, 2021
Pehle kyun nahi khela aise....defensive khel rha tha.....31 ball 31 run
— @anirudha11 (@Anirudhasatapat) October 8, 2021
एका युझरने म्हटलं आहे की पूर्ण मॅनेजमेंट टीम देखील बदलून टाका. तर दुसऱ्या युझरने म्हटलं की 2022 मध्ये के एल राहुलला पंजाब संघातून रिलीज करा.आयपीएल हंगामात के एल राहुलने दमदार कामगिरी केली आहे. संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरण्यात अपयशी ठरला असला तरी कर्णधार राहुलच्या कामगिरीमुळे चेन्नईला पराभूत करण्यात यश मिळालं आहे. राहुल सध्या आयपीएलमध्ये 98 धावांची सर्वोत्तम खेळी करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
राहुलच्या नावावर 626 धावा आहेत आणि त्याच्या पाठोपाठ चेन्नईचा फाफ डु प्लेसिस आहे, ज्याच्याकडे सध्या 546 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आहे, ज्याने आतापर्यंत 533 धावा केल्या आहेत.