IPL 2021: टी नटराजन मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही? हे व्हीव्हीएस लक्ष्मणनकडून उघड

चेन्नईमध्ये मुंबई इंडीयन्सविरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये डाव्या हाताने खेळणारा वेगवान गोलंदाज टी नटराजनला मॅचमध्ये न उतरवण्या मागील कारण सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी उघड केले. 

Updated: Apr 18, 2021, 04:10 PM IST
IPL 2021: टी नटराजन मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही? हे व्हीव्हीएस लक्ष्मणनकडून उघड title=

चेन्नई : चेन्नईमध्ये मुंबई इंडीयन्सविरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये डाव्या हाताने खेळणारा वेगवान गोलंदाज टी नटराजनला मॅचमध्ये न उतरवण्या मागील कारण सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी उघड केले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आणि नटराजनच्या जागी खलील अहमदला (Khaleel Ahmed) मैदानात उतरवले. परंतु एसआरएचने हा सामना 13 धावांनी गमावला त्यामुळे या बदलाचा सनरायझर्सला फारसा फायदा झाला नाही. या सीझनमधील सनरायझर्स हैदराबादचा हा तिसरा पराभव आहे.

खेळाच्या शेवटी लक्ष्मण म्हणाला की, नटराजनच्या डाव्या गुडघ्यात छोटी इंज्यूरी आहे. ज्यामुळे तो ही मॅच खेळू शकला नाही. सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना सनरायझर्स हैदराबादच्या मार्गदर्शकांनी असे सांगितले की, वैद्यकीय पथक नटराजनच्या दुखापतीवर लवकरच उपाय करतील आणि त्यावर निर्णय देतील.

"हो दुर्दैवाने, डाव्या गुडघ्यात दुखापत झाल्यामुळे नटराजन या सामन्यातून  बाहेर पडला. तो हा सामना खेळण्यासाठी फीट नव्हता आणि म्हणूनच आम्ही त्याच्या जागी खलील अहमदला मैदानात उतरवले. आम्ही नटराजनच्या दुखापतीवर लवकरच उपाय करणार आहोत आणि मला खात्री आहे की, सनरायझर्सचे वैद्यकीय कर्मचारी योग्य निर्णय घेतील, जे नटराजनसाठी आणि फ्रेंन्चायझीसाठी फायदेशीर ठरेल." असे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एएनआयला सांगितले.

लक्ष्मण पुढे खलीलच्या कामगिरीबद्दल बोलला आणि आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात त्याच्या चांगल्या प्रदर्शनाचे कौतुक केले. हैदराबादसाठी त्याने 1 बळी घेतला आणि त्याच्या 4 ओव्हरमध्ये 24 धावा दिल्या.

"सीझनच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये खलील अहमदने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावर मी खूप प्रभावित झालो आहे. मला असे वाटते की, त्याने परिस्थितीला ओळखून आपला खेळ दाखवला आणि जबाबदारी पार पाडली. खलील अहमदने एसआरएचसाठी बरीच सकारात्मक खेळी खेळली." असे व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.

यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचे संचालक टॉम मूडी यांनी स्टार स्पोर्ट्सच्या टीकाकारांशी बोलताना सांगितले की, "नटराजनला विश्रांती देण्यात आली आहे, त्याला मॅचमधून वगळण्यात आलेले नाही."

सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना बुधवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे.