IPL 2021 SRH vs KKR: सामन्यापूर्वी मुलीकडून बाबाला क्युट शुभेच्छा! फोटो व्हायरल

SRH vs KKR सामन्यापूर्वी चिमुकलीनं बाबांना क्युट स्टाईलनं शुभेच्छा दिल्या. ही क्युट गर्ल कोण आहे आणि सामन्याआधी तिने कशा पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत पाहा फोटो

Updated: Apr 11, 2021, 04:02 PM IST
IPL 2021 SRH vs KKR: सामन्यापूर्वी मुलीकडून बाबाला क्युट शुभेच्छा! फोटो व्हायरल title=

मुंबई: IPLमधील तिसरा सामना आज चेपॉक स्टेडियमवर होत आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी सनरायझर्स संघातील कर्णधाराला त्याच्या मुलीकडून क्युट शुभेच्छा मिळाल्या आहेत. या शुभेच्छांमुळे त्याची ऊर्जा वाढली असून त्याने आपल्याला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक या चिमुकलीचा असतो असं सांगितलं आहे. 

सनरायझर्स संघाच्या कर्णधारानं या क्युट चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटो पाहून तुम्हीही या चिमुकलीच्या प्रेमात पडाल. इतक्या गोड पद्धतीनं तिने आपल्या बाबाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

या फोटोमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची मुलगी आहे. ही चिमुकली इतक्या सुंदर पद्धतीनं संध्याकाळच्या मॅचसाठी वडिलांना चिअर्स करायला तयार झाली आहे. हे पाहून तुम्हालाही खूप भारावल्यासाखं वाटेल. डेव्हिडनं तिचा फोटो शेअर केला आहे. तुम्ही पहिल्या सामन्यासाठी तयार असाल तर हात वर करा आणि तयार व्हा सामन्यासाठी. पुढे डेव्हिड म्हणतो मला सर्वात जास्त आणि सगळ्यात पहिला सपोर्ट करणारी क्युट गर्ल तयार आहे म्हणत त्याने फोटो शेअर केला आहे.

दोन विदेशी कर्णधारांमधील आज कडवी लढत चेपॉकवर पाहायला मिळणार आहे.  मागच्या मोसमात दोन वेळा KKR संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता याचा बदला आजच्या सामन्यात घेण्यासाठी हैदराबाद संघानं तगडी स्ट्रॅटजी तयार केली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेवन

डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, ऋद्धिमान साहा/ अब्दुल समद, केदार जाधव/विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा

कोलकाता नाईट रायडर्स  संभाव्य प्लेइंग इलेवन

इयोन मॉर्गन, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल/पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, वरूण चक्रवर्ती/हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी