पहिली हॅट्रीक मारल्यानंतर तो प्लेअर पगार वाढीवर अडून बसला - वीरेंद्र सहवाग यांनी सांगितलेला किस्सा

अमित मिश्राने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात  4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. 

Updated: May 7, 2021, 12:10 PM IST
पहिली हॅट्रीक मारल्यानंतर तो प्लेअर पगार वाढीवर अडून बसला - वीरेंद्र सहवाग यांनी सांगितलेला किस्सा

मुंबई: IPL 2021च्या चौदाव्या हंगामात कोरोना शिरल्यामुळे सामन्यांना ब्रेक लागला आहे. तूर्तास सामने स्थगित करण्यात आले असून उर्वरित सामन्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या झालेल्या रोमांचक सामन्यानंतर विरेंद्र सेहवाग यांनी एक किस्सा शेअर केला होता. हा किस्सा खूप चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने हॅट्रिक केली. 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स आपल्या नावावर करत दिल्ली संघाला जिंकवून दिलं. पहिल्यांदा जेव्हा अमित मिश्राने हॅट्रिक केली होती त्यावेळी त्याने विरेंद्र सेहवाग यांच्याकडे एक गोष्ट मागितली होती. हा किस्सा सेहवाग यांना आजही लक्षात आहे त्यांनी तो शेअर केला आहे. 

हॅट्रिक करताच मागितली खास गोष्ट

'अमित मिश्रा एक अतिशय शांत व्यक्ती आहे. तो सर्वांशी कायमच आदराने बोलतो इतकंच नाही तर तो पटकन संघात देखील मिसळतो. तो मनमिळवू आहे म्हणूनच तो संघातील प्रत्येकाचा आवडता आहे.'

'मला आठवतं जेव्हा 2008 मध्ये त्याने पहिल्यांदा हॅट्रिक केली होती. तेव्हा मी त्याला विचारलं होतं तुला काय हवं? त्यावर अमित मिश्राने शांतपणे सांगितलं, 'वीरू भाई प्लीज माझा पगार वाढवा ना.' मला आशा आहे की त्याच्या आताच्या हॅट्रिकवेळी त्याला पुन्हा हे वाक्य बोलावं लागणार नाही. आता त्याला त्याच्या अपेक्षे इतका पगार मिळत असावा असंही विरेंद्र सेहवाग यांनी सांगितलं आहे. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने 6 विकेट्सने सामना जिंकला. यामध्ये सर्वात मोठा वाटा अमित मिश्राचा होता. त्याला या सामन्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं. त्याने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या.