IPL 2022, Csk vs Kkr Head To Head | चेन्नई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण जिंकणार पहिला सामना?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर उद्यापासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स (Csk vs Kkr) विरुद्ध होणार आहे.   

Updated: Mar 25, 2022, 06:59 PM IST
IPL 2022, Csk vs Kkr Head To Head | चेन्नई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण जिंकणार पहिला सामना? title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर उद्यापासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स (Csk vs Kkr) विरुद्ध होणार आहे. यावेळेस कोलकाताची धुरा ही युवा श्रेयस अय्यरकडे (Shreys Iyer) असणार आहे. तर सीएसकेची कॅप्टन्सी ही रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) करणार आहे. (ipl 2022 1st match csk vs kkr head to head records chennai super kings against kolkata knight riders ravindra jadeja shreyas iyer)

कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्णपणे आयपीएलचं भारतात आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

दरम्यान या पहिल्या सामन्यात चेन्नई बाजी मारणार की कोलकाता विजयी सलामी देणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. आयपीएलच्या इतिहासाता आतापर्यंत चेन्नई कोलकातावर वरचढ ठरली आहे.    

चेन्नईने कोलकाताला शेवटच्या 4 सामन्यात पराभूत केलंय. चेन्नईने गेल्या मोसमात कोलकाताला पराभूत करत विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे कोलकाताला विजय मिळवून देत गेल्या पराभवाचा वचपा घेण्याचा मानस कॅप्टन श्रेयसचा असेल. 

अशी आहे आकडेवारी (CSK vs KKR Head to Head)
 
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नईने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर कोलकाताने 9 मॅचमध्ये चेन्नईला उपट दिली आहे. तर एकमेव उर्वरित सामना हा टाय राहिला. त्यामुळे आकडेवारीनुसार तरी चेन्नईच कोलकातावर वरचढ आहे.  

नव्या कर्णधारांचा कस लागणार

यंदा कोलकाता आणि चेन्नईची धुरा नव्या खेळाडूंची हाती आहे. त्यामुळे कॅप्टन्सी करताना जाडेजा आणि अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. यामुळे पहिला सामना जिंकून कोणता संघ विजयी पताका उंचावणार हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत.