मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 11 व्या सामन्यात (IPL 2022) चेन्नई विरुद्ध पंजाब (CSK vs PBKS) आमनेसामने असणार आहेत. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या (Mahedra Singh Dhoni) नावावर मैदानात उतरताच आणखी एका कीर्तीमानाची नोंद होणार आहे. धोनी आज आपल्या टी 20 कारकिर्दीतील 350 वा सामना खेळणार आहे. धोनी अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरणार आहे. आतापर्यंत रोहित शर्माने 350 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. रोहितने 372 टी 20 मॅच खेळल्या आहेत. (ipl 2022 csk vs pbks chennai super kings mahendra singh dhoni will play 350th t20 match)
रोहित शर्मा - 372
एमएस धोनी - 349*
सुरेश रैना - 336
दिनेश कार्तिक - 329
विराट कोहली - 328
धोनीने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 349 सामन्यांमध्ये 7 हजार 1 धावा केल्या आहेत. धोनीने नुकत्याच लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 बॉलमध्ये 16 धावांची खेळी करत 7 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
धोनी या 15 व्या मोसमात शानदार कामगिरी करताना दिसतोय. धोनीने सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध 38 बॉलमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
चेन्नईची या मोसमातील निराशाजनक सुरुवात झाली. चेन्नईने खेळललेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चेन्नईचा पंजाब विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.