IPL 2022 | लाईव्ह सामन्यादरम्यान कपलचा 'किसिंग सीन' व्हायरल

या सामन्यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र जिथे कोणाचंच लक्ष नव्हतं तिथं कॅमेरामॅनचं लक्ष होतं.

Updated: Apr 3, 2022, 05:38 PM IST
IPL 2022 | लाईव्ह सामन्यादरम्यान कपलचा 'किसिंग सीन' व्हायरल title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) 2 एप्रिलला डबर हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील दुसरा सामना हा गुजराच टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र जिथे कोणाचंच लक्ष नव्हतं तिथं कॅमेरामॅनचं लक्ष होतं. (ipl 2022 match 10 gujrat titans vs delhi capitals couple kissing video viral on social media)

त्याचं झालं असं की, सामना पाहायला आलेल्या एका जोडप्याचा किस घेतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. गुजरात आणि दिल्लीत सामना सुरु होता. मात्र इथे स्टेडियममध्ये या कपलचा भलताच सामना सुरु होता. हे कॅमेरामॅनच्या लक्षात आलं. मग काय, या दोघांचा किसिंग सीन क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही स्क्रीनवर पाहिला.

हा सर्व प्रकार दिल्लीच्या बॅटिंगदरम्यान घडला. दिल्लीच्या 32 धावा असताना हे कपल किसिंग करताना टीव्ही स्क्रीनवर दिसले.  दरम्यान या कपलचा किसिंग सीनचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Insta Desi (@insta_desii)