IPL 2022 Mega Auction: 4 खेळाडूंना CSK रिटेन करण्याच्या तयारीत? कोण आहेत लिस्टवर

चौथ्यांदा IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी संघाला मोठा धक्का? 

Updated: Oct 22, 2021, 08:21 PM IST
IPL 2022 Mega Auction: 4 खेळाडूंना CSK रिटेन करण्याच्या तयारीत? कोण आहेत लिस्टवर

मुंबई: IPL 2022 साठी दोन टीम नव्या येणार आहेत. 2022 मध्ये 10 टीममध्ये IPL चे सामने होणार आहेत. या सामन्यांआधी खेळाडूंवर बोली लागेल. या लिलावासाठी एक मोठी बातमी येत आहे. चेन्नई संघातील चार खेळाडूंना रिटेन केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. या खेळाडूंवर पुन्हा एकदा मोठी बोली लावली जाऊ शकते. 2022 मध्ये होणाऱ्या ऑक्शनमध्ये 90 कोटींपर्यंत बोली लावली जाऊ शकते असा कयास आहे. 

आगामी इंडियन प्रीमियर लीग लिलाव (आयपीएल 2022) साठी खेळाडूंच्या धोरणावर एक करार झाला आहे. सध्याच्या आठ फ्रँचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची सर्व शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस किंवा ड्वेन ब्राव्हो या दोघांपैकी एक CSK मध्ये पुढच्या IPL साठी म्हणजेच पुढच्या 2022 साठीच्या हंगामासाठी निवडण्यात आले आहे.

यासह, दोन नवीन आयपीएल संघांना लिलावाबाहेर 2 किंवा 3 खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. (यात कोणतेही प्रमुख भारतीय खेळाडू उपलब्ध नसल्यास परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे). एका टीममध्ये तीन भारतीय खेळाडू आणि दोन विदेशी खेळाडू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन कऱण्यासाठी देखील काही नियम लावण्यात येऊ शकतात. 

आयपीएल 2022 मध्ये 90 ते 95 कोटींपर्यंत बोली लावली जाऊ शकते. 90 कोटी वरून 95 कोटी किंवा 100 कोटी पर्यंत वाढवली जाऊ शकते. जर एखाद्या फ्रँचायझीने चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर त्याला साधारण सुमारे 40-45 टक्के खर्च करावा लागेल. जे कोणत्याही खेळाडूला कायम न ठेवण्याची निवड करणाऱ्या फ्रँचायझीपेक्षा 36-40 कोटी रुपये कमी आहे.