IPL 2022, MI | मुंबईचा सलग तिसरा पराभव, तरीही पलटण 'एक नंबर'

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022) बुधवारी (6 एप्रिल) कोलकाता विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. 

Updated: Apr 7, 2022, 07:52 PM IST
IPL 2022, MI | मुंबईचा सलग तिसरा पराभव, तरीही पलटण 'एक नंबर' title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022) बुधवारी (6 एप्रिल) कोलकाता विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवामुळे मुंबईच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. मात्र अशा या निराशाजनक कामगिरीनंतरही मुंबई अव्वल स्थानी आहे. (ipl 2022 mi mumbai indians number one team in fair play points table) 

मुंबई फेयरप्ले अवॉर्ड्सच्या ( IPL Fair Play Awards) पॉइंट्सटेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. मुंबई आपल्या 3 मॅचनंतर फेयरप्ले अवॉर्ड्सच्या पॉइंट्स टेबलमध्ये  31 पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. सरासरीनुसार मुंबई पहिल्या स्थानी विराजमान आहे.  

खेळाडूंच्या मैदानातील वागणुकीनुसार फेयरप्ले पॉइंट्स दिले जातात. तसेच स्पर्धेच्या शेवटी जी टीम अव्वल स्थानी असते, त्या टीमला बक्षिस दिलं जातं.  आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा चेन्नई सुपर किंग्सला हा पुरस्कार मिळाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सीएसके तिसऱ्या स्थानी आहे.