IPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली

Updated: Apr 3, 2022, 02:56 PM IST
IPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी title=

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम राजस्थानसाठी लकी ठरला. गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंतही पोहोचता न आलेल्या राजस्थान टीमने यंदा तुफान कामगिरी केली. राजस्थान टीमने सलग दुसरा विजय मिळवला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थान टीमची खूप चर्चा होत आहे. 

आयपीएलच्या पॉईंट टेबलवर राजस्थान संघ 4 पॉईंट्सने पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता तिसऱ्या स्थानावर हार्दिक पांड्याचा गुजरात संघ आहे. चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स संघ आहे. 

पाचव्या स्थानावर लखनऊ तर सहाव्या स्थानावर बंगळुरू संघ आहे. त्याखालोखाल पंजाब, चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद संघ आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि मुंबई टीमचा जोर कमी पडल्याचं दिसत आहे. राजस्थान टीमने चांगली प्रगती केली आहे. गेल्या हंगामात मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये कडवी लढत होती.

यंदाच्या हंगामात 2 नव्या टीम आल्या आहेत. टीम देखील बदलल्या आहेत यंदाचे सामने चुरशीचे तर होत आहेतच पण गेल्यावर्षीपेक्षा हे निकाल अनपेक्षित आणि वेगळे आहेत. यंदा ट्रॉफी कोण घेऊन जाणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.