IPL 2022 | आयपीएलच्या 15 वा मोसम सुरु असताना ऑलराउंडरचा खेळाडूचा क्रिकेटला रामराम

या खेळाडूने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या स्टार ऑलराऊंडर खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Updated: Apr 9, 2022, 11:12 PM IST
IPL 2022 | आयपीएलच्या 15 वा मोसम सुरु असताना ऑलराउंडरचा खेळाडूचा क्रिकेटला रामराम title=

मुंबई : आयपीएलच्या 15  व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. या मोसमात राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) दमदार कामगिरी करत आहे. राजस्थानच्या टीममधील एक स्टार खेळाडू हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. या खेळाडूने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या स्टार ऑलराऊंडर खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.  (ipl 2022 rr rajsthan royals james neesham neesham shared funny instagram post about retirment after nets practise with riyan parag)

आयपीएलच्या मध्यावर निवृत्तीची घोषणा

राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर जिमी निशामने (James Neesham) आयपीएलच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली आहे. निशामने इंस्टाग्रामवर नेट्समध्ये सराव करतानाचा एक व्हीडिओ आणि एक फोटो पोस्ट केला आहे.  या व्हिडिओमध्ये निशाम रियान परागला  बॉलिंग टाकतोय. या नेट प्रॅक्टिसदरम्यान रियानने जोरदार फटका मारला. रियानने जोरात फटकवलेला बॉल निशामच्या तोंडाजवळून गेला. सुदैवाने यात निशामला काहीही झालं नाही. मात्र निशाम जमिनीवर पडला.
 
सराव सत्रानंतर निशामने इंस्टाग्राम पोस्ट केली. या पोस्टमध्ये "मी आतापासून माझी निवृत्ती जाहीर करतो.  रियानला नेटमध्ये बॉलिंग करण्यातून मी निवृत्ती घेतोय. अर्थात निशामने मस्करीत ही पोस्ट केली आहे. 

निशामची आयपीएल कारकिर्द

निशामने आयपीएलमध्ये 2014 साली पदार्पण केलं. निशाम आतापर्यंत आयपीएलमध्ये 12 सामने खेळला आहे. निशामने या 12 सामन्यात  92.42 च्या स्ट्राइक रेटने 61 धावा केल्या आहेत. तसेच 8 विकेट्स घेतल्या आहेत. निशामने राजस्थान रॉयल्सपूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे.