IPL 2022 सुरू होण्याआधी 10 संघांना मोठा धक्का, BCCI चं वाढलं टेन्शन

आयपीएल सामने सुरू होण्याआधीच वाढलं 10 संघांचं टेन्शन, BCCI चे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू 

Updated: Mar 9, 2022, 07:03 PM IST
IPL 2022 सुरू होण्याआधी 10 संघांना मोठा धक्का, BCCI चं वाढलं टेन्शन title=

मुंबई : IPL 2022 : आयपीएलचे सामने सुरू होण्याआधीच 10 संघांना आणि BCCI ला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. आता यावर BCCI काय तोडगा काढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यामुळे आयपीएलमधील 10 संघांचं टेन्शन वाढलं आहे. 

26 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहेत. तर दुसरीकडे बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची टीम जाहीर झाली आहे. या टीममध्ये आयपीएलमध्ये खेळणाऱ्या 8 खेळाडूंचा सामावेश आहे. इतकच नाही तर हे खेळाडू 15 एप्रिलपर्यंत बांग्लादेश दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे 24 ते 26 पहिले IPL 2022 चे सामने हे खेळाडू अनुपस्थित असणार आहेत. 

आता दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नेमकं काय निवडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे BCCI यामध्ये मध्यस्ती करून कोणता पर्याय काढता येतो का हे पाहणार आहे. कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणारा क्विंटन डिकॉकही वन डे सीरिज खेळणार आहे. डिकॉक आयपीएलमध्ये लखनऊ संघाकडून खेळणार आहे. 

वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (पंजाब किंग्स), एनरिक नोर्किया (दिल्ली कॅपिटल्स), मार्को जेन्सेन (सनराजायझर्स हैदराबाद) आणि लुंगी एनगिडी (दिल्ली कॅपिटल्स) कसोटी मालिकेपूर्वी आयपीएलमध्ये परत येणार की नाही याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलं नाही. वनडे संघात ड्वेन प्रिटोरियस, रुसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर यांचाही समावेश आहे. फाफ डु प्लेसिसने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

 एनरिक नोर्किया आताच दुखापतीमधून सावरत आहे. त्यामुळे तो वनडे आणि आयपीएल दोन्ही सुरुवातीचे सामने खेळेल की नाही याबाबत शंका आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डकडून देखील याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तो नोव्हेंबरपासून मैदानात खेळताना दिसला नाही.