लखनऊ विरुद्ध पहिला सामना जिंकण्यासाठी केन विलियम्सनचा मास्टरप्लॅन

पहिला विजय मिळवण्यासाठी हैदराबाद सज्ज, लखनऊ विरुद्ध सामन्यासाठी केन टीम बदलणार?

Updated: Apr 4, 2022, 03:20 PM IST
लखनऊ विरुद्ध पहिला सामना जिंकण्यासाठी केन विलियम्सनचा मास्टरप्लॅन title=

मुंबई : गेल्या हंगामातही हैदराबाद संघ फार चांगली कामगिरी करू शकला नाही. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणार का पाहावं लागणार आहे. सुरुवात निराशाजनक झाली असली तरी पुन्हा केन पॉईंट टेबलवर आपलं खातं उघडू शकेल अशी आशा आहे. 

आयपीएलमध्ये केन विलियम्सनची टीम अजून चांगली कामगिरी करू शकली नाही. या सामन्यान केनची टीम लखनऊवर भारी पडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हैदराबादकडे धुरंधर खेळाडू आहेत त्यामुळे त्याचा फायदा टीमला कसा होणार हे या सामन्यात पाहावं लागणार आहे. 

हैदराबादला विजयासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. लखनऊ टीमकडे उत्तम गोलंदाज आहेत. आवेश खान, दुष्मंथा चमिरा, एड्र्यू टाय, रवी बिश्नोई सारख्या खेळाडूंमुळे लखनऊ टीम कधी खेळ पलटवेल सांगता येणार नाही. जर हैदराबादने त्यांच्यासमोर मोठी धावसंख्या उभारली तर तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जाऊ शकतो. 

हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे. लखनऊने 2 सामन्यात 1 विजय आणि 1 पराभवासह 2 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे.

सनराइजर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऐडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, आवेश खान, रवि बिश्नोई, एंड्रयू टाय