IPL 2023 :शुभमन गिलच्या बहिणाला बलात्कार, हत्येची धमकी; 'त्या' कमेंट्सची महिला आयोगाकडून दखल

Shubman Gill Sister Abusing Case: शुभमन गिलची बहीण शहनीलला सोशल मीडियावर बलात्कार, हत्येची धमकी आणि अश्लील कमेंट्स करुन ट्रोल करण्यात येतं आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2023, 07:25 PM IST
IPL 2023 :शुभमन गिलच्या बहिणाला बलात्कार, हत्येची धमकी; 'त्या' कमेंट्सची महिला आयोगाकडून दखल title=
ipl 2023 action will be taken against those who troll shubman gills sister shahneel gill delhi commission cheif swati maliwal delhi police to file fir

Delhi Women's Commission : आयपीएल 2023 चा थरार आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये दाखल झाला आहे. तरदुसरीकडे गुजरात टायटन्सने IPL-2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला हरवलं. सध्या आयपीएलमध्ये शुभमन गिल चर्चेत आहे. किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा प्रवास संपला आणि चाहते नाराज झाले. पण त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कृत्य केलं आहे. 

विराटच्या चाहत्यांनी हे काय केलं?

RCB प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभमन गिल आणि त्याची बहीण शहनील गिल हिला ट्रोल करण्यास सुरु केली. धक्कादायक म्हणजे ट्रोलने मर्यादा ओलांडत शहनील हिला बलात्कार, हत्येची धमकी दिली. एवढंच नाही तर अश्लील कमेट्ंस केले. (ipl 2023 action will be taken against those who troll shubman gills sister shahneel gill delhi commission cheif swati maliwal delhi police to file fir)

दिल्ली महिला आयोगाकडून ट्रोल्स निशाणावर

आता या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने दिल्ली पोलिसांना बुधवारी नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय 26 मे पर्यंत दिल्ली पोलिसांनी या घटनेची सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. 

स्वाती मालीवाल काय म्हणाल्यात?

स्वाती मालीवाल यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ''ट्रोसर्सनी #ShubhmanGil बहिणीला शिवीगाळ करताना पाहणं खूप लाजिरवाणे आहे. यापूर्वी आम्ही #ViratKohli च्या मुलीला शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली होती.''

दरम्यान आयपीएल 2023च्या या सिझीनमध्ये शुभमन गिल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. त्याने आतापर्यंत 14 सामन्यांत 680 रन्स केले आहेत. ज्यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.