IPL 2023 CSK vs DC Playing 11: जगातील सर्वात मोठी असलेली इंडियन क्रिकेट लीग अर्थात आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएलमधले शेवटचे चार सामने शिल्लक असून या दोन दिवसात प्ले ऑफचं (Play Off) चित्रही स्पष्ट होणा आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) प्ले ऑफमधलं आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता उरलेल्या तीन जागांसाठी सहा संघांमध्ये जबरदस्त चुरस रंगली आहे. यात चेन्नई सुपर किंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (MI), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), राजस्थान रॉयल्सचा (RR) आणि कोलकाता नाईट रायर्स संघांचा (KKR) समावेश आहे.
आज डबल हेडर सामना
आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने रंगणार आहेत. यातला पहिला सामना एमएस धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) दिल्ली कॅपिटल्सदरम्यान (Delhi Capitals) रंगणार आहे. दिल्लीचं स्पर्धेतलं आव्हन याआधीच संपुष्टात आलं आहे. पण चेन्नईला प्ले ऑफला पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे. या सामन्यात दिल्ली जिंकली तर चेन्नईला इतर संघाच्या पराभव आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागेल.
दिल्लीचं तगडं आव्हान
चेन्नईच्या एका पराभवाने धोणीचं स्वप्न भंग पाऊ शकतं. दिल्ली संघाला पराभवाने फारसा फरक पडणार नाही, पण स्पर्धेचा शेवट विजयाने करण्यासाठी दिल्ली जीवतोड मेहनत करेल हे नक्की. गेल्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्सचा 15 धावाने पराभव केला होता. त्यामुळे दिल्लीला कमी लेखण्याची चूक चेन्नई सुपर किंग्स करणार नाही हे नक्की.
धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा?
एम एस धोनी येत्या 7 जुलैला 42 वर्षांचा होईल. वाढतं वय पाहता धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आहेत. ही गोष्ट खरी असेल तर धोनीसाठी चेन्नईचा संपूर्ण संघ जेतेपदासाठी पूर्ण जोर लावेल. धोणीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने याआधी चारवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.
दिल्लीचं होम ग्राऊंड
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई संघाने 13 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत. पॉईंटटेबलमध्ये चेन्नई 15 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने दिल्लीविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांची प्ले ऑफमधली जागा पक्की होईल. चेन्नई आणि दिल्ली दोनही संघांचा हा शेवटचा सामना आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या होम ग्राऊंडवर होत असल्याने वॉर्नरच्या संघाला फायदा होणार आहे. तर धोनीच्या चेन्नईसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.
कोणाचं पारडं जड?
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. आतापर्यंत दिल्ली आणि चेन्नईदरम्यान 28 सामने खेळवले गेले आहेत. यात तब्बल 18 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.
चेन्नई सुपर किंग्स (संभाव्य प्लेईंग 11)
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, अंबाति रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणा
दिल्ली कॅपिटल्स (संभाव्य प्लेईंग 11)
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश ढुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, ईशांत शर्मा और खलील अहमद.