WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा मोठा झटका, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

ICC WTC Final 2023 : एक क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.  ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने असा निर्णय घेतला आहे जो टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2023, 09:44 AM IST
WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा मोठा झटका, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी title=

ICC WTC  Final 2023 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC WTC मधील अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल  मैदानावर खेळवला जाणार आहे. या महास्पर्धेत मोठा बदल करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्यूक्स बॉलने खेळला जाणार नाही. या सामन्यापूर्वी आयसीसीने असा निर्णय घेतला आहे जो टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु ठरणार आहे.

हा सामना ड्यूकऐवजी 'या' बॉलने खेळवला जाणार

या सामन्याआधी ICC ने मोठी निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना ड्यूक बॉल ऐवजी कुकाबुरा बॉलने खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने याला दुजोरा दिला आहे. त्यांने म्हटलेय, आयसीसीने ड्यूक्सऐवजी कुकाबुरा चेंडू वापरण्यास संमती दिली आहे.  इंग्लंडमध्ये असे पहिल्यांदाच घडणार आहे, जेव्हा टीम इंडिया ड्यूक्स बॉलने कसोटी क्रिकेट खेळणार नाही. गेल्यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला तेव्हा ड्यूक्स बॉलचा वापर करण्यात आला होता. मात्र काही काळापासून ड्यूक बॉलचा दर्जा घसरल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  

ड्यूक बॉल का वापरत नाहीत?

आयसीसीच्या या मोठ्या निर्णयानंतर ड्यूक बॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले की, 'माझा अंदाज आहे की, अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या टॅनिंग प्रक्रियेत काही तांत्रिक समस्या आहे. आत्तापर्यंत आपण ही समस्या दूर करु शकलेलो नाही. कारण टॅनिंग आणि डाईंगची प्रक्रिया महत्त्वाची असते. जर कोणी ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त केमिकल टाकले किंवा डाई दुसर्‍या एखाद्या निर्मात्याकडून आले तर या सर्व छोट्या गोष्टींचा चेंडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर परिणाम होतो. दरम्यान, काही काळासाठी हा चेंडू पटकन त्याचा आकार बदलतो आणि खूप लवकर मऊ होतो. या कारणास्तव, चेंडू बराच वेळ स्विंग होत नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, रविचंद्रन. , उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियन टीम :

पॅट कमिन्स (सी), स्कॉट बोलँड, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), डेव्हिड वॉर्नर, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेजलवाड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, टॉड मर्फी , मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.