Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Playing 11 Prediction : आज आयपीएल 2023 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामना रंगणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चेन्नईने 19 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार वेळा सामने जिंकले आहेत. एमएस धोनी विरुद्ध विराट कोहली यांच्यात कोणत्या संघाचा विजय होईल? या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? तसेच दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? सविस्तर जाणून घ्या...
आज (17 एप्रिल 2023) संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामना पार पडणार आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यातील दोन सामने जिंकले असून दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघासोबत पराभव सहन करावा लागला तर लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विजयाची थाप मिळाली. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही दोन सामने जिंकले तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. RCB विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स बरोबर पराभव पत्करावा लागला. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB ने विजय मिळवला.
आयपीएलच्या इतिहास चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चेन्नईने 19 सामने जिंकले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार सामने जिंकले आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आजच्या या सामन्यावर कोणाची वरचढ ठरणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मगाला, एमएस धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, थिक्षाना, आकाश सिंग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एमके लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, व्हॅन पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार विशक